शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सांगली बाजार समिती : दिनकर पाटील सभापती - उपसभापतिपदी तानाजी पाटील, निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:02 IST

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे दिनकर महादेव पाटील (सोनी) यांची, तर उपसभापतिपदी तानाजी पांडुरंग पाटील (जाखापूर) यांची बिनविरोध निवड झाली.

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे दिनकर महादेव पाटील (सोनी) यांची, तर उपसभापतिपदी तानाजी पांडुरंग पाटील (जाखापूर) यांची बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी गटातील सर्व नेत्यांनी एकत्र येत दहा-दहा महिन्यांसाठी सर्वांना संधी देण्याचा निर्णय घेत कोणताही विरोध न होता निवडी पार पडल्या.

निवडीनंतर नूतन पदाधिकाºयांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.मिरजचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधित सभापतिपदासाठी दिनकर पाटील यांनी, तर उपसभापतिपदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडी होणार हे स्पष्ट झाले. सत्ताधारी गटाच्या सर्व नेत्यांनी एकमताने ही निवड केली.

बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर सर्व संचालक पंधरा दिवसांपूर्वी सहलीवर गेले होते. बुधवारी सायंकाळी सर्व पन्हाळा येथे होते, तर गुरुवारी सकाळी सांगलीत दाखल झाले. या कालावधित सत्ताधारी गटाचे नेते आ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जयश्रीताई पाटील, विक्रम सावंत आदींनी चर्चा करून मदन पाटील यांचे समर्थक दिनकर पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.

ही निवड दहा महिन्यांसाठी असून, त्यानंतर जत तालुक्याला संधी देण्यात येणार आहे. तर त्यापुढील दहा महिन्यांसाठी मिरजेला संधी देण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले.गेल्यावेळी सत्ताधारी गटातच बेबनाव निर्माण झाल्याने तणावात निवडी झाल्या होत्या. आता मात्र खेळीमेळीच्या वातावरणात निवडी पार पडल्या.

विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या घोरपडे गटाचे संचालक यावेळी उपसभापतिपदासाठी तानाजी पाटील यांना सूचक आणि अनुमोदक म्हणून हजर होते. दिनकर पाटील यांना सूचक म्हणून देयगोंडा बिरादार, तर अनुमोदक म्हणून माजी सभापती प्रशांत शेजाळ यांनी स्वाक्षरी केली.निवडीनंतर खा. संजयकाका पाटील, माजी आ. दिनकर पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.१०-१० चा फॉर्म्युलाविद्यमान संचालक मंडळाला अजूनही तीन वर्षांचा कालावधी मिळणार असल्याने व सर्व संचालकांना पदावर संधी देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार विद्यमान निवडी या १० महिन्यांसाठी झाल्या आहेत. पुढील दहा महिन्यांसाठी जत तालुक्याला, तर त्यानंतर मिरज तालुक्याला संधी देण्यात येणार आहे. बाजार समितीवर निवडून आलेल्या प्रत्येक संचालकाला कामाची संधी मिळावी म्हणून हा फॉर्म्युला असल्याचे सत्ताधारी गटाचे नेते विक्रम सावंत यांनी सांगितले.पारदर्शक कारभाराला प्राधान्य : पाटीलनूतन सभापती दिनकर पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात विद्यमान संचालक मंडळाने अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, हमाल यासह सर्व घटकांना विचारात घेऊनच कारभार केला जाईल. पणन मंडळाकडून मार्गदर्शन मागवून बाजार समितीच्या उत्पन्न वाढीला प्राधान्य देणार आहे. यापुढे पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गटबाजी व राजकारण बाजूला ठेवून माझी सभापतीपदी निवड केली आहे.गटतट विसरून निवडी : संजयकाका पाटीलसभापती निवडीची प्रक्रिया सुरू असताना खा. संजयकाका पाटील उपस्थित होते. निवडीनंतरही त्यांच्याच हस्ते नूतन पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांचा विकास केंद्रबिंदू मानून सर्व गटतट विसरून या निवडी करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडीवेळी काही अडचणीचे प्रसंग आणण्यात आले. मात्र, पक्षविरहीत निवडी झाल्या आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली